परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
कौठळीत लोकसेवा ग्राम विकास पॅनलनचा जोरदार प्रचार
प्रचारामध्ये सरपंचपदाच्या उमेदवार सौ.दगडूबाई एकनाथ नानेकर यांच्यासह सर्वच उमेदवार अग्रेसर
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे कौठळी येथील ग्राम पंचायत निवडणुकीत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे व वाल्मिक आणा कराड यांच्या मार्गदर्शनाखालील लोकसेवा ग्राम विकास पॅनलने प्रचारात जोरदार बाजी मारली आहे. सरपंचपदाच्या उमेदवार सौ. दगडूबाई एकनाथ नानेकर यांच्यासह सर्वच प्रभागातील उमेदवार अग्रेसर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे
कौठळीत आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसेवा ग्राम विकास पॅनल निवडणूक लढवित असुन गावातील सर्वच प्रभागामध्ये सरपंचपदाच्या उमेदवार सौ. दगडूबाई एकनाथ नानेकर यांना आणि पॅनलच्या सर्वच उमेदवारांना नागरीकांमधुन चांगला प्रतिसाद मिळत आहे. उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर दिला आहे. वार्ड क्रमांक 1 मधील उमेदवार शेषराव रामभाऊ हाके आणि सौ. दैवशाला वाल्मीक अघाव, वार्ड क्रमांक 2 मधुन नवनाथ गंगाधर हाके, सौ. शोभा मधुकर झिंजुर्डे, सौ. ज्ञानेश्वरी चंद्रकांत शिंदे, वार्ड क्रमांक 3 मधुन भालचंद्र एकनाथ गुंजकर, सौ. दिपाली शैलेंद्र झिंजुर्डे, सौ. अनुसया सोपान घुले, वार्ड क्रमांक 4 मधुन विलास रामदास राठोड, आयशा सिकंदर शेख, प्रशांत धोंडीराम झिंजुर्डे हे उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
मागील काळात अनेक विकासकामे मार्गी लागली असुन आम्ही अतिशय दर्जेदार कामे केली आहेत असे सांगून आगामी काळातही गावचा सर्वांगीण विकास करणार असुन मतदारांनी आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखालील लोकसेवा ग्राम विकास पॅनलच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन माजी उपसरपंच आणि उमेदवार भालचंद्र गुंजकर व एकनाथ नानेकर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा