युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-संत केदारेश्वर संत सेवालाल ग्राम विकास पॅनलला मतदान करा-आवाहन

 गावच्या सर्वांगीण विकासासाठी संत केदारेश्वर संत सेवालाल ग्राम विकास पॅनलला मतदान करा - प्रभाकर राठोड, मधुकर भांगे,सुशन डोंगरे, महादेव  सानप,भास्कर गित्ते




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी तालुक्यातील ग्रामपंचायतींची रणधुमाळी सध्या सुरू असून, गावच्या सर्वांगीण विकासासाठी उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन प्रचार करत आहेत. तालुक्यातील लमाण तांडा येथील संत केदारेश्वर संत सेवालाल ग्रामविकास पॅनल ला प्रतिसाद दिसत आहे. सरपंच पदाचे उमेदवार सौ. पार्वतीबाई प्रभाकर राठोड तसेच, वार्ड क्रमांक ४ चे उमेदवार राजेभाऊ मधुकर भांगे ,सौ. कल्पना प्रल्हाद सानप ,सौ.गंगाबाई भास्कर गित्ते आदी उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे.लमाण तांड्यावरील ग्रामपंचायत निवडणूक प्रचारामध्ये इतर पॅनलच्या तुलनेत गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे पॅनल प्रमुख प्रभाकर राठोड, मधुकर भांगे यांनी प्रचारामध्ये असल्याचे सांगितले. 


Click:



गाव ताड्यावरील विकास कामे करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही विकास कामांसाठी निधी मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून  गावच्या तांड्यावर नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी संत केदारेश्वर संत सेवालाल ग्राम विकास पॅनल कटिबद्ध आहे. संत केदारेश्वर संत सेवालाल ग्रामविकास पॅनलचे प्रमुख प्रभाकर राठोड, मधुकर भांगे,सुशन बापूराव डोंगरे, महादेव पिराजी सानप भास्कर गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली संत केदारेश्वर संत सेवालाल पॅनलने प्रचारात आघाडी घेतली आहे. एकच ध्यास, फक्त विकास  हे ध्येय ठेवून विकास करण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.तालुक्यात आदर्श ग्राम पंचायत म्हणून, नावलौकिक मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे. गावच्या विकासासाठी येत्या 18 डिसेंबर रोजी संत केदारेश्वर संत सेवालाल ग्रामविकास पॅनल मतदान करण्याचे आवाहन प्रभाकर राठोड, मधुकर भांगे,सुशन बापूराव डोंगरे, महादेव पिराजी सानप, भास्कर गित्ते यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या