प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:GNM नर्सिंग झालेल्या (तीन वर्षीय डिप्लोमा धारक ) नर्सिंग ऑफिसर यांना राज्य शासनाने CHO म्हणून तात्काळ नियुक्ती द्यावी

 GNM नर्सिंग झालेल्या (तीन वर्षीय डिप्लोमा धारक ) नर्सिंग ऑफिसर यांना राज्य शासनाने CHO म्हणून तात्काळ नियुक्ती द्यावी 

 युनायटेड नर्सेस असोसिएशन तर्फे राज्यभर तीव्र आंदोलन करणार-अनिल जायभाये बीडकर


 (पुणे ) 

     दि.11.01.2023 बुधवार रोजी           उपसंचालक कार्यालय,आरोग्य सेवा पुणे येथे असे निवेदन देण्यात आले की केंद्र सरकार च्या नियमानुसार इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागातील सामान्य माणसाला योग्य त्या आरोग्य सोयी सुविधा पुरवण्यासाठी व शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य यंञना तत्परतेने पोहचण्यासाठी ,सक्षम मनुष्य बळ उपलब्ध असावे व केन्द्र सरकार ने ईतर राज्यांना दिलेल्या निकषानुसार महाराष्ट्रात सुध्दा जनरल नर्सिंग मिडवाईफरी (GNM) या नर्सिंगच्या तीन वर्षीय डिप्लोमा धारक उमेदवार यांना कम्युनिटी हेल्थ ऑफिसर / समुदाय आरोग्य अधिकारी CHO म्हणून तात्काळ पदभरती मध्ये सहभागी करावे,नियुक्ती मिळावी व महाराष्ट्र राज्य शासनाने त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी केली व भविष्यात मागणी मंजुर न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले त्यावेळी युनायटेड नर्सेस असोसिएशन चे मार्गदर्शक जिबीन टि. सी.सर व पुणे येथील पदाधिकारी तथा नर्सिंग ऑफिसर सुरेश भवर सर ,संदिप बनसोडे सर  ,सुनिल राऊत सर ,सुनिल राठोड सर ,रोहित अवचिते सर , आनिल जायभाये बीडकर व अन्य नर्सिंग ऑफिसर उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या