प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:बंडातात्या कराडकर यांना पक्षाघाताचा झटका; पुढील उपचार पुण्यात, प्रकृती स्थिर

 बंडातात्या कराडकर यांना पक्षाघाताचा झटका; पुढील उपचार पुण्यात, प्रकृती स्थिर


 वारकरी संप्रदायातील धडाडीचे संत म्हणून ओळख असणारे आणि राज्यभर व्यसनमुक्तीची चळवळ चालवणारे हभप बंडातात्या कराडकर  यांना पक्षाघाताचा सौम्य झटका  आला आहे. त्यांच्यावर सातारा जिल्ह्यातील फलटण इथल्या निकोप हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. बंडातात्या यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती निकोप रुग्णालयातील डॉक्टर जे टी पोळ यांनी दिली. 


बंडातात्या यांची प्रकृती स्थिर


बंडातात्या कराडकर हे पुण्याहून कीर्तन करुन फलटण तालुक्यातील पिंप्रद इथल्या मठात आले होते. बंडातात्या यांना काल (12 जानेवारी) सकाळी त्रास जाणवू लागल्यावर निकोप हॉस्पिटलमध्ये त्यांच्या साधकांनी दाखल केले होते. यावेळी तात्यांचा रक्तदाब आणि शुगर खूपच वाढल्याने त्यांचा त्रास वाढला होता. यामुळे त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका येऊन गेल्याचे लक्षात येताच हॉस्पिटलमधील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार सुरु केले. कालच्या उपचारानंतर तात्यांची प्रकृती स्थिर झाली. यानंतर त्यांचा MRI आणि अँजिओग्राफी केल्यावर मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांत थोडे ब्लॉकेज असल्याचे दिसून आले. त्यामुळे मेंदूला होणार रक्तपुरवठा कमी होत असल्याने डॉक्टरांनी यावर देखील तातडीने उपचार सुरु केले. 


पुढील उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयात हलवलं  


दरम्यान बंडातात्या यांना आज पुणे इथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर डिजिटल सब्स्ट्रक्शन अँजिओग्राफी केली जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सध्या तात्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नसल्याचे साधकांकडून सांगण्यात येत आहे. तात्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती मिळताच त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने फलटणमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. 


बंडातात्या कराडकर... कायम चर्चेत असलेलं नाव


बंडातात्या कराडकर हे नेहमी चर्चेत असणारं नाव आहे. अनेक वादांमध्ये बंडातात्या यांचं नाव समोर आलेलं आहे. मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना आषाढी एकादशीच्या पूजेसाठी पंढरपुरात येण्यास विरोध करणं असो वा महाविकास आघाडीने सरकारच्या वाईनबाबतच्या धोरणावर टीका करताना सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यासंदर्भात केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य असो, किंवा 2008 मध्ये डाऊ या केमिकल कंपनीविरोधात केलेलं आंदोलन असो, बंडातात्या कराडकर हे कायमच चर्चेत राहिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या