सर्वांचे प्रेम सदैव माझ्या साठी उर्जादायी; अनाठायी खर्च टाळण्याचे आवाहन

 पाऊस नाही: शेतकरी अडचणीत; समारंभपूर्वक वाढदिवस साजरा न करण्याचा बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा निर्णय


🕳️ सर्वांचे प्रेम सदैव माझ्या साठी उर्जादायी; अनाठायी खर्च टाळण्याचे आवाहन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी ---- : 


          बीड जिल्ह्यात अद्यापही चांगला पाऊस नाही शेती आणि शेतकऱ्यांवर संकटाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ११ ऑगस्ट रोजी असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा वाढदिवस उत्सवी स्वरूपात साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सर्वांचे प्रेम सदैव माझ्यासाठी उर्जादायी असुन वाढदिवसा वरील उत्सवी स्वरुपातील अनाठायी खर्च टाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


      पावसाअभावी सर्वत्र परिस्थिती गंभीर असुन शेती आणि शेतकऱ्यांवर संकटाचे सावट आहे.  या परिस्थितीत समारंभ पुर्वक वाढदिवस करणे मनस्वी टाळावे वाटते. सर्वांच्या शुभेच्छा - आशीर्वाद मला लढण्याचे बळ देतात. परंतु या परिस्थितीत वाढदिवस उत्सवी साजरा न करता साधेपणाने असावा असे मनोमन वाटते.त्यामुळे आयोजित रक्तदान शिबीरात सहभाग नोंदवून रक्तदान श्रेष्ठ दान करावे. उत्सवी स्वरुपातील अनाठायी खर्च टाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार