इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

बीड जिल्ह्यातील कामगारांसाठी भालचंद्र जगदाळे यांचे विशेष प्रयत्न

 कामगार कल्याण मंडळाच्या मराठवाडा विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त म्हणून  भालचंद्र जगदाळे यांनी स्विकारला  पदभार 




बीड जिल्ह्यातील कामगारांसाठी भालचंद्र जगदाळे यांचे विशेष प्रयत्न 


परळी  : (प्रतिनिधी)

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या मराठवाडा विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त या  पदाचा पदभार भालचंद्र जगदाळे यांनी स्विकारला. 

श्री. जगदाळे हे कामगार कल्याण मंडळाच्या  गट कार्यालय लातूर येथे कामगार कल्याण अधिकारी म्हणून कार्ययत होते. 

त्यांनी बीड, लातुर व धाराशिव जिल्ह्यातील कामगारांना जास्तीत जास्त लाभ मिळून दिला.

 त्यांची नुकतीच लातूर येथून औरंगाबाद येथे सहाय्यक कल्याण आयुक्त म्हणून बदली झाल्याने त्यांचे औरंगाबाद येथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शानदार स्वागत केले आहे.


 औरंगाबाद येथील ललित कला भवन येथे मंगळवार  भालचंद्र जगदाळे यांनी  मराठवाडा विभागीय सहाय्यक कल्याण आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारला . यावेळी विभागीय कार्यालय व गट कार्यालय औरंगाबाद येथील कर्मचारी यांनी त्यांचे छोटेखानी  स्वागत समारंभात स्वागत केले. अधिकारी  व कर्मचाऱ्यांनी त्यांना पुषगुच्छ देवून हृदय स्वागत व सत्कार  केला. विभागीय कार्यालयातील  लेखा अधिकारी नितीन निंभोरकर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या