इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

• मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

 ■ माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त ११ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन


 • मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन


परळी वैजनाथ/ प्रतिनिधी......


     कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे परळी शहरातील कर्तृत्ववान उमदे युवा नेतृत्व व परळीच्या सर्वांगीण विकासाचा मुख्यदुवा म्हणून यशस्वी कारकीर्द निर्माण केलेले माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त  (दि.११) रोजी  रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

       राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेने बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक ११ ऑगस्ट रोजी स्व. श्री. मणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह,आंबेवेस, परळी वैजनाथ येथे दि.११ ऑगस्ट २०२३ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० वा.पासुन शिबिराचा शुभारंभ होणार आहे. दिवसभर रक्तदात्यांना रक्तदान करता येणार आहे.        

          दरवर्षी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. गेल्या १० वर्षांपासुन सातत्याने घेण्यात येणारे व मोठ्या सहभागाचे शिबीर म्हणून हा सामाजिक उपक्रम परळीत अग्रेसर ठरलेला आहे.दरवर्षी नवनविन रक्तदात्यांना प्रोत्साहित करून रक्तदानाचे कार्य रूजविणे बाबत जागृती करणारा परळीतील हा उपक्रम आहे.या शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन बाजीराव भैय्या  धर्माधिकारी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या