शालेय गणवेश वाटप

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट येथे शालेय गणवेशाचे वितरण


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

शासनाच्या योजनेअंतर्गत येणाऱ्या शालेय गणवेशाचे वाटप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट या ठिकाणी गावचे सरपंच श्री बंडू गुट्टे यांच्या तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे व मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी वितरीत करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. मुख्याध्यापक श्री डी बी राठोड यांनी शाळेच्या उपक्रमांची माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. लवकरच दुसरा गणवेश विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे असेही ते पुढे म्हणाले. 

गावचा विकास करून कायापालट करणाऱ्या सरपंच श्री बंडू गुट्टे यांनी शाळेसाठी लवकरच विज्ञान प्रयोगशाळा साहित्य देणार असल्याचे सांगून विविध योजनेतून शाळेच्या भौतिक विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. 


कार्यक्रमास शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष श्री हनुमान देवकते, गावचे उपसरपंच श्री लक्ष्मण गुट्टे, ग्रामपंचायत सदस्य श्री अरुण खांडेकर, चेअरमन श्री लक्ष्मण गुट्टे, श्री शालिवाहन परमेश्वर गुट्टे, बिभीषण गुट्टे, बालासाहेब गुट्टे, श्री व्यंकू तात्याराव गुट्टे, श्री महादेव गुट्टे, श्री नितीन गुट्टे, श्री अर्जुन दहिफळे, श्री रामकिशन गुट्टे,   यांच्यासह शिक्षकवृंद सर्वश्री मुंडे, फुटके, तरूडे, स्वामी व श्रीमती काळे मॅडम यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार