दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

जिल्ह्यात परळीत सर्वाधिक तर बीड मतदारसंघात सर्वात कमी मतदान!

अचूक अन् अधिकृत आकडेवारी आली : जिल्ह्यात सर्वाधिक परळी मतदारसंघात 75.27 टक्के मतदान

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात आज प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत परळी मतदार संघात विक्रमी मतदान झाले असुन एकूण  75.27 टक्के इतके मतदान झाले आहे. निवडणूक विभागाकडून अचुक अन् अधिकृत आकडेवारी आली असुन जिल्ह्यात सर्वाधिक परळी मतदारसंघात 75.27 टक्के मतदान झाले आहे.

     परळी विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या प्रक्रियेत  दि. 20 रोजी सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदारांनी घराबाहेर पडून उस्फूर्तपणाने मतदान केले. संपूर्ण दिवसभर मतदानाची गती चांगली असल्याचेच दिसून आले. मतदार संघातील व परळी शहरातील सर्वच मतदान केंद्रे मतदारांनी गजबजुन गेल्याचे दिसून आले. दुपारी 3 वाजेपर्यंतच्या निवडणूक विभागाच्या अहवालानुसार सरासरी 50 टक्के मतदान पार पडले होते.
         मतदान करण्याची वेळ संपल्यानंतर मतदानाची टक्केवारी ही 75.27 टक्के इतकी झाली. निवडणूक विभागाकडून अंतिम आकडेवारी अचूक करून अधिकृत टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदानाच्या आकडेवारीवरून सरासरी परळी मतदारसंघात एकूण 75.27 टक्के इतके मतदान झाले आहे. एकंदरीतच परळी विधानसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणावर व उत्स्फूर्तपणाने मतदान झाले आहे. मतदानाचा वाढलेला टक्का कोणत्या उमेदवाराच्या फायद्याचा राहील हे मात्र दि. 23 रोजी जाहीर होणाऱ्या निकालातूनच स्पष्ट होणार आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....