इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

परळी मतदारसंघात आत्तापर्यंत 40 टक्के मतदान

परळी मतदारसंघात आत्तापर्यंत 40 टक्के मतदान


 परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आज सकाळपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी तीन वाजेपर्यंत परळी मतदारसंघात अंदाजे 40 टक्के मतदान झाले आहे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात सकाळपासून अतिशय शांततेने मतदानाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे त्याचप्रमाणे सकाळच्या टप्प्यामध्ये मोठ्या संख्येने मतदारांनी प्रतिसाद देत रांगेत उभे राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे दुपारी एक वाजेपर्यंत चा निवडणूक विभागाच्या अधिकृत अहवाल निवडणूक विभागाला सादर करण्यात आला असून दुपारी एक पर्यंत परळी मतदारसंघात 36.23% इतके मतदान झाले होते आत्ता तीन वाजेपर्यंत परळी विधानसभा मतदारसंघाची मतदानाची गती पाहता हे मतदाना अंदाजे 40% झाले आहे एकंदरीतच मतदानाच्या प्रक्रियेत मतदारांची चांगली गती दिसून येत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट