धनंजय मुंडे यांनी संपूर्ण मुंडे कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

धनंजय मुंडे यांनी संपूर्ण मुंडे कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क 

         आज दुपारी 1 च्या सुमारास परळी विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे यांनी संपूर्ण मुंडे कुटुंबासह आपले जन्मगाव नाथ्रा येथे मतदानाचा हक्क बजावला.


यावेळी आ.पंकजाताई मुंडे यांच्यासह धनंजय मुंडे यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई मुंडे, काकी प्रज्ञाताई मुंडे, माजी खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे, ऍड.यशश्रीताई मुंडे, युवक नेते अजय मुंडे, रामेश्वर मुंडे, नाथ्रा गावचे सरपंच अभय मुंडे, डॉ. संतोष मुंडे, बी-बियाणे राज्य समितीचे सदस्य अतुल मुंडे, सुरेश मुंडे, सचिन मुंडे, रामेश्वर तात्या मुंडे यांसह मुंडे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.


यावेळी माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांनी परळीसह बीड जिल्ह्यातील जनतेला मतांचा टक्का वाढवण्याचे आवाहन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !