युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 एन . एम . एम . एस . परीक्षेत श्री शंकर विद्यालयाचे घवघवीत यश

पाच विदयार्थी शिष्यवृतीसाठी पात्र

घाटनांदूर ( प्रतिनिधी ) .

शैक्षाणिक गुणवत्तेचे माहेर घर असलेल्या ज्ञानविकास शिक्षण प्रसारक मंडळ , संचलित श्री  शंकर विद्यालय , घाटनांदुर या विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक अर्थात एन . एम . एम . एस . परीक्षेत घवघवीत यश मिळविले . या विद्यालयाचे एकूण पाच विदयार्थी प्रत्येकी 60,000 रु प्रमाणे शिष्यवृत्तीस पात्र ठरले . 

          डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एन . एम . एम . एस . परीक्षेतील शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली . त्यानुसार या विद्यालयाचे विद्यार्थी अनुक्रमे कु . शुभांगी गणपती मुंडे , चि . आदित्य सचिन सारडा , कु . सिद्धी विष्णू मुंडे , कु . मधु सुर्यकांत गित्ते , कु . रुपाली राम गान्ने या विद्यार्थ्यानी घवघवीत यश मिळविले . या विद्यार्थ्याना प्रत्येक 60,000 रु प्रमाणे एकूण 3,00,000 रु शिष्यवृत्ती मिळणार आहे .

श्री शंकर विद्यालय घाटनांदुरने विविध स्पर्धा परीक्षा व शालांत परीक्षामध्ये उत्कृष्ट यशाची परंपरा कायम राखली आहे . विद्यार्थ्यांच्या या सुयशाबद्धल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री पंडितराव दौंड , सचिव संजय भाऊ दौंड तसेच सर्व पदाधिकारी , प्राचार्य व्ही . एल . गित्ते , पर्यवेक्षक व्ही . एम . दौंड , शिक्षक , प्राध्यापक , कर्मचारी आदिनी अभिनंदन केले . यशस्वितांना येथील शिक्षक एन. एम . एम . एस . विभाग प्रमुख डी .डी . नाकाडे , सौ . एस . जे . गाडे मॅडम , एस . पी . गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या