इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

भीषण अपघात:तीन जणांचा मृत्यू एक गंभीर

अंबाजोगाई :तालुक्यातील बर्दापूर - हातोला रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर  धडक होऊन तिघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. लिमगाव पाटीजवळ शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला.

      अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर-हातोला रस्त्यावर भीषण अपघात झाला. दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली. लिमगाव पाटीजवळ शनिवारी रात्री 7.30च्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात एक जण जागीच ठार झाला, तर दोघांचा उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना मृत्यू झालाय.या अपघातात अभय सतीश चव्हाण (रा. बर्दापूर) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर समोरून येणाऱ्या दुचाकीवरील फारूख रहिमखाँ पठाण आणि नासीर खाजामियाँ शेख (दोघेही रा. पानगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लातूरकडे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात ऋषिकेश अशोक चव्हाण हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या