नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन

परळी वैजनाथ मध्ये १४ वर्षांवरील मुलींसाठी मोफत ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिम सुरू 

नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी): भारतातील महिलांमध्ये गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग हे मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण ठरत आहे. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ (HPV) लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च २०२६ पासून परळी वैजनाथ येथे या विशेष मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ येथील वैद्यकीय अधीक्षकांनी यासंदर्भात माहिती दिली. या विशेष मोहिमेअंतर्गत राज्यातील ज्या मुलींनी वयाची १४ वर्षे पूर्ण केली आहेत, मात्र ज्या अद्याप १५ वर्षांच्या झालेल्या नाहीत, अशा किशोरवयीन मुलींना या लसीचा एक डोस दिला जाणार आहे. हे लसीकरण परळी येथील उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण विभागात दररोज सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. गर्भाशयाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी पात्र मुलींनी आणि पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!