परळीकरांना मिळणार अस्सल दाक्षिणात्य चव; ‘स्वामीज् सांबर’चा रविवारी होणार शुभारंभ



परळी वैजनाथ (प्रतिनिधी):

परळीतील खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात 'अस्सल साऊथ इंडियन' चवीचा नजराणा घेऊन 'स्वामीज् सांबर' हे नवीन उपहारगृह सज्ज झाले आहे. या उपहारगृहाचा शुभारंभ अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर, रविवारी १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता संपन्न होणार आहे.

या उपहारगृहाचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. भालचंद्र वाचनालय कॉम्प्लेक्स, फाऊंडेशन शाळेच्या बाजूला, परळी वैजनाथ या मध्यवर्ती ठिकाणी हे हॉटेल सुरू होत आहे.या उद्घाटन समारंभाला परळीकरांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीकांत घनशामजी तोतला आणि नरेश ज्ञानेश्वर (माऊली) चिकणे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!