इमेज
 " मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी; घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन!" परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... "मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी दिली. त्यानंतर ती एकटीच असताना घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरवट ता. परळी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. आरमान मुबारक शेख रा. मिरवट ता. परळी वै हा पीडिता मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या घरी जाऊन " तु मुझे रात को खंडोबा मंदीरके पास मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" असे म्हणुन धमकी दिली. पीडितेचा हात धरुन त्याने तिला जवळ ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी धमकी व विनयभंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास पोउपनि निमोणे हे करीत आहेत. 2

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पंकजा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप




विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिक्षण घेऊन नाव उज्ज्वल करावे -नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):

        भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'पंकजा फाउंडेशन'च्या वतीने गरजूवंत विद्यार्थ्यांना वही आणि पेनचे वाटप करण्यात आले.    

      मंगळवार, १४ एप्रिल रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिक्षणाशिवाय प्रगती नाही, हा बाबासाहेबांचा विचार कृतीत आणण्यासाठी फाउंडेशनने हा पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, रिपाई नेते सचिन कागदे, नगरसेवक वैजनाथ सोळंके, केशव नागरगोजे, सोपान ताटे, अश्विन मोगरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार युवक नेते रणवीर चक्रे तसेच पंकजा फाउंडेशनचे अध्यक्ष दयावान चक्रे यांनी केला. यावेळी पंकजा फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल करावे," असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष सौ .पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले. पंकजा फाउंडेशनच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकजा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या