परळी उपजिल्हा रुग्णालयात नेफ्रॉलॉजिस्ट आणि ICU सुविधा उपलब्ध करा; महादेव गंगणे पाटील यांची मागणी



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांच्या समस्यांकडे लक्ष वेधत, येथे तातडीने तज्ज्ञ डॉक्टर (नेफ्रॉलॉजिस्ट) आणि आयसीयू (ICU) सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष महादेव सोपानराव गंगणे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अँड. जीवनराव देशमुख यांच्यासह त्यांनी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ यांना लेखी निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिसची सुविधा उपलब्ध आहे, मात्र तिथे या विषयातील तज्ज्ञ नेफ्रॉलॉजिस्ट डॉक्टर उपलब्ध नाहीत. तसेच रुग्णालयात अतिदक्षता विभागाची (ICU) सोय नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती अनेकदा नाजूक असते. अशा वेळी अचानक प्रकृती बिघडल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांची आणि आयसीयू सुविधेची गरज भासते.

सध्या या सुविधा रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी तातडीने दुसऱ्या शहरात हलवावे लागते. या प्रवासात रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने खालील मागण्या पूर्ण कराव्यात :

१) रुग्णालयात किमान एक नेफ्रॉलॉजिस्ट (मूत्रपिंड विकार तज्ज्ञ) उपलब्ध करून द्यावा.

२) रुग्णालयात तातडीने आयसीयू (ICU) सुविधा सुरू करावी.

या मूलभूत आरोग्य सुविधा मिळाल्यास स्थानिक रुग्णांना मोठा दिलासा मिळेल आणि वेळेवर उपचार मिळून प्राण वाचण्यास मदत होईल, असेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष महादेव सोपानराव गंगणे पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...