संभाजीनगर पोलिसांनी केली धडक कारवाई...
मुद्देमाल जप्त : परळीत गावठी हातभट्टी दारू विक्रीवर कारवाई
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
परळी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टीची दारू बाळगून विक्रीसाठी ठेवणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली असून गावठी हातभट्टीची दारू व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाण पुलाखालील पत्र्याच्या शेडजवळील मोकळ्या जागेत आरोपी हा विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगून आला. त्यानुसार कारवाई करताना आरोपीच्या ताब्यातून ४० लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक कॅनमध्ये एकूण ८० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.आरोपी हा आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू बाळगून तिची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाल्याने संभाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी साजिद हबीब खान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष सूर्यभान गायकवाड (वय २६, रा. शिवाजीनगर, परळी वैजनाथ) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक घोडके करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा