पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल...
खेळतांना आडबाजूला घेऊन गेला, अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; खळबळजनक घटना
परळी वैजनाथ:प्रतिनिधी...
तालुक्यातील जिरेवाडी येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी मारुती मंदिर परिसरात खेळताना अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या आईने तिचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नव्हती. काही वेळानंतर अतिप्रसंग झालेल्या अवस्थेत रडत रडत ही मुलगी घरी आली. त्यानंतर या अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी गावातीलच एका युवकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिरेवाडी येथे ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पिडीत अल्पवयीन मुलगी गावातील मारोती मंदिराच्या परिसरात खेळण्यासाठी गेली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही.कुटुंबीयांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र मुलीचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतरकाही वेळाने अतिप्रसंग झालेल्या अवस्थेत रडत रडत ही मुलगी घरी आली. तिच्यावर घडलेल्या अतिप्रसंगाची कहाणी तिने आपल्या कुटुंबीयांना सांगितली. याबाबत मुलीच्या आईने परळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या फिर्यादीवरून गावातीलच २७ वर्षीय तरुणावर मुलीला फूस लावून नेले, बळजबरी तिच्यावर अतिप्रसंग केला, शारीरिक अत्याचार केला म्हणून पोक्सो कायद्याअंतर्गत आकाश भरत नागरगोजे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 64 (1), 64(2)(I), 65(1) भारतीय न्याय संहितासह 4.6.8.12 पोस्को कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा