आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रकरण जलदगती कोर्टात चालवा*

 नाळवंडीतील पिडित चिमुकलीला न्याय देऊ



ना. पंकजा मुंडेंचे बीड एसपींना निर्देश ; आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रकरण जलदगती कोर्टात चालवा

बीड दि. १२ --- नाळवंडी ता. पाटोदा येथील आठ वर्षाच्या चिमुकलीवर झालेली अत्याचाराची घटना अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक असून यातील नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती कोर्टात चालवावे असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

    या प्रकरणी आज ना. पंकजाताईंनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना फोन करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यास सांगितले.  नाळवंडी गावातील एका आठ वर्षाच्या चिमकुलीवर ६५ वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला. या घटनेने पिडीत चिमुकलीचे  कुटुंब भयभीत झाले आहे. घटनेतील  आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि आरोपीवर कठोरात कठोर शासन करावे असे ना. पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!