ना. पंकजा मुंडे यांची युवा शेतकरी संघर्ष समितीला ग्वाही...
माजलगांव धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय ; मंत्रालयात बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू
ना. पंकजा मुंडे यांची युवा शेतकरी संघर्ष समितीला ग्वाही
मुंबई दि. १२ ---- माजलगांव (जि.बीड) येथील धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला गेल्याने परिसरातील बावीस गावातील शेतकरी हवालदिल झाले असून याबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी युवा शेतकरी संघर्ष समितीला दिली.
माजलगांव धरण परिसरातील बावीस गावच्या शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून युवा शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय रद्द व्हावा यासाठी आंदोलन सुरू केले आहे. या शेतकऱ्यांनी आज माजलगांव मधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यां मार्फत ना. पंकजाताई मुंडे यांच्याशी संपर्क साधून हा सर्व विषय त्यांच्या कानावर घातला. ना. पंकजाताईंनी शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले आणि यासंदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक बोलवून विस्तृतपणे चर्चा करून योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.
••••

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा