महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्यकार्यकारिणी बैठक व व्याख्यान
परळी / प्रतिनिधी
महाअंनिस ची राज्यकार्यकारिणी ची बैठक मानवलोक अंबाजोगाई येथे १२ व १३ सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे . या बैठकीसाठी महाराष्ट्रातील जवळपास ३० जिल्ह्यातील १०० ते १५० कार्यकर्ते येणार आहेत . कार्यकारी समिती, प्रत्येक जिल्ह्यातील कार्याध्यक्ष व प्रधान सचिव, समितीच्या २४ विभागाचे कार्यवाह,सहकार्यवाह येत आहेत. मागील ३ महिन्यातील समितीच्या कामाचा आढावा व पूढील महिन्यातील कामाचे नियोजन यावर सविस्तर चर्चा केली जाते .
तसेच या निमित्ताने शनिवारी १२ सप्टेंबर रोजी सांयकाळी ६ वाजता सांगली येथील लेखक व इतिहास संशोधक प्रा.डॉ. काशिलिंग गावडे यांचे व्याख्यान होणार आहे . हे व्याख्यान शहरातील लोकांसाठी बौद्धिक पर्वणीच असते . या व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन महाअंनिस बीड जिल्हाच्या वतीने करण्यात आले आहे .
याप्रसंगी महाअंनिसचे राज्याध्यक्ष माधव बावगे, कार्याध्यक्ष संजय बनसोडे , सर्व विभागाचे प्रधान सचिव, राज्य सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत .
या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन बीड जिल्हा महाअंनिस च्या वतीने करण्यात आले आहे. कार्यकारिणी बैठक यशस्वी होण्यासाठी अंबाजोगाई महाअंनिस परिश्रम घेतले आहे .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा