शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

 परळी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; विविध प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

परळी वैजनाथ : परळी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, सन २०२५ च्या खरीप पिकांच्या विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची प्रलंबित रक्कम लाभार्थ्यांना तत्काळ वितरित करावी, यासह तालुक्यातील विविध प्रलंबित विकासकामे पूर्ण करावीत, अशा विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी लाटकर साहेब यांना देण्यात आले.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरुण मराठवाडा संपर्क नेते अंबादास दानवे उप नेत्या प्रा .सुषमाताई अंधारे बिड जिला संपर्क प्रमुख परशुराम जाधव उप संपर्क प्रमुख बाळासाहेब आंबुरे बिड जिला प्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे उप जिला प्रमुख नारायण सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना परळी तालुका प्रमुख  भोजराज पालीवाल यांच्या नेतृत्वाखाली उप जिल्हाधिकारी लाटकर साहेबांना निवेदन देण्यात आले. 

निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये परळी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकरी व नागरिकांना दुष्काळी सवलतींचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच २०२५ मधील खरीप पिकांच्या पीकविम्याची रक्कम मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पात्र शेतकऱ्यांना तातडीने अदा करावी, अशी मागणी करण्यात आली.यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ वाटप करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

परळी-गंगाखेड रस्त्याचे अर्धवट व प्रलंबित काम तातडीने पूर्ण करावे, तसेच परळी तालुक्यातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांना गती देऊन ती कामे पूर्ण करावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

तसेच परळी-बीड रेल्वे मार्गाचे काम तातडीने पूर्ण करून हा रेल्वे प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणीही करण्यात आली. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना दळणवळणाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असून, त्याचा विकासालाही मोठा फायदा होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

याशिवाय तालुक्यातील रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन, शेतकरी प्रश्न आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा अनेक मागण्या निवेदनातून करण्यात आल्या

शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहून या मागण्यांवर तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या वेळी  उपजिला प्रमुख नारायन सातपुते तालुका प्रमुख भोजराज पालीवाल शिवसेना शहरप्रमुख राजेश विभुते विधानसभा प्रमुख जगन्नाथ साळुंखे जेष्ठ शिवसेनेचे नेते सुंदर  उमरे ,साबळे मामा तालुका समन्वय  भरत  ईगले तालुका संघटक हनुमान भारती उप तालुका प्रमुख शंकर डाके,महेश केंद्रे उप शहरप्रमुख  विशाल गावंडे तालुका समन्वय विद्यार्थी सेना नीलेश बोतुले मांडवा विभाग प्रमुख श्रीकृष्ण नागरगोजे  वडगाव विभाग प्रमुख पंडित गुट्टे भोपळा चे शाखा प्रमुख लक्ष्मण मुंडे नागपूरचे सचिन गोरे मिरवत  चे बापूं इंगळे गोविंद इंगळे घोडा कोडगाव शाखा प्रमुख  राधाकिसन नाइक नवरे शाखा प्रमुख विजय जाधव हरीश पालीवाल आजी माझी पढ़आधिकारि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!