पावसाळा आला की शिक्षणावर पडते पाणी नाहीतर जीव धोक्यात घालून शाळेची वाट ! विद्यार्थ्यांचा थरारक प्रवास, पुलाअभावी शिक्षणच धोक्यात परळी वैजनाथ | प्रतिनिधी.. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे असे शासन वारंवार सांगते. मात्र परळी तालुक्यातील गाढेपिंपळगाव येथील आरसुळे वस्तीवरील विद्यार्थ्यांचे वास्तव या दाव्याला छेद देणारे आहे. पाऊस सुरू झाला की या चिमुकल्यांच्या शिक्षणावर अक्षरशः पाणी पडते. शाळेत पोहोचण्यासाठी त्यांना चिखल तुडवत किंवा पाण्याच्या प्रवाहातून जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाढेपिंपळगाव आणि आरसुळे वस्तीच्या दरम्यान पापनाशी नदी वाहते. सुमारे पंचवीस-तीस वर्षांपूर्वी नदीपलीकडे काही कुटुंबांनी वास्तव्यास सुरुवात केली. कालांतराने ही वस्ती वाढत गेली असून आज येथे जवळपास २० ते २५ कुटुंबे राहतात. मात्र लोकसंख्या वाढली, वस्ती वाढली; पण मूलभूत सुविधा मात्र आजही पोहोचलेल्या नाहीत. उन्हाळा आणि हिवाळ्यात नागरिक नदीत भराव टाकून तयार झालेल्या तात्पुरत्या रस्त्याने ये-जा करतात. पण पावसाळा सुरू झाला ...