स्थानिक यंत्रणेच्या उदासीनतेमुळे डॉ. प्रितमताई मुंडे थेट गडकरींना भेटल्या...

माजलगाव-तेलगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रितम मुंडे यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट

पालखी मार्गाची दुर्दशा मिटणार, गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद

दिल्ली ( दि. ३० )  जिल्ह्याच्या माजी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्लीस्तीत निवासस्थानी भेट घेतली. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 548 सी या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत त्यांनी गडकरी यांना निवेदन सादर करत सदरील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली.


बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या शेगाव-पंढरपूर पालखी महामार्गाची माजलगाव ते तेलगाव दरम्यान अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्याला पडलेल्या भेगांमुळे या मार्गावर अपघाताच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी ही गंभीर बाब नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या सोयीसाठी सदरील रस्त्याची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.

राज्यातील दोन महत्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा रस्ता असल्यामुळे आपणही याबाबतीत सकारात्मक असल्याचे सांगत नितीन गडकरी यांनी दुरुस्तीसंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या आहेत. नितीन गडकरी यांनी दखल घेऊन दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे लवकरच या रस्त्याची दुर्दशा संपणार असून लवकरच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कार्यवाही होणार असल्याचा विश्वास डॉ. प्रितम मुंडे यांनी व्यक्त केला.

स्थानिक यंत्रणेच्या उदासीनतेमुळे डॉ. प्रितम मुंडे थेट गडकरींना भेटल्या

पालखी महामार्गातील माजलगाव ते तेलगाव दरम्यानच्या रस्त्याला भेगा पडत असल्याची बाब निदर्शनास आल्यापासून डॉ. प्रितमताई मुंडे यांनी वेळोवेळी याविषयी स्थानिक यंत्रणेशी संपर्क केला. 2023 पासून त्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेकडे यंत्रनेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, बांधकाम विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठानी याकडे सपशेल दुर्लक्ष केले. वारंवार पत्र व्यवहार करून देखील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक पातळीवरून हालचाली होत नसल्याचे बघून डॉ. प्रितमताई मुंडे यांनी थेट दिल्ली गाठली आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रस्त्याच्या दुरावस्थेचा विषय मांडला. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची नितीन गडकरी यांनी दखल घेतली असून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली आहे.


••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!