बचत गट, घरकुले आणि पांदण रस्ते इत्यादी योजनेत परळी मतदारसंघ जिल्ह्यात पहिल्या स्थानावर येईल, असे काम करू

 वैयक्तिक योजनांचा लाभ घरपोच मिळवून देणार - धनंजय मुंडे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानात धनंजय मुंडे यांच्या हस्ते शेकडो लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभांचे वाटप

परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) -      

  छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबिर अंतर्गत आज विविध शासकीय योजनेतील शेकडो लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वाटप प्रातिधिनिक स्वरूपात केले जात असले तरी आगामी काळात प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरपोच योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी केले आहे. 

       राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या प्रथम जयंतीच्या औचित्याने परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघातील विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण करण्यासाठी राज्य सरकारचा उपक्रम असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. 

      जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना बीड जिल्ह्यात 28 हजार पेक्षा अधिक घरकुले एकाच वर्षात देण्याचा वती पूर्ण करण्याचा विक्रम आपण केला. त्याचप्रमाणे एकट्या परळी तालुक्यामध्ये 2024-25 या एका वर्षामध्ये विविध योजना मिळून सुमारे 14000 घरकुले मंजूर करण्यात आले असून त्यापैकी निम्मे पूर्ण झाले आहेत, असे सांगत महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उमेद अभियान अंतर्गत सुरू असलेल्या कामाचेही यावेळी धनंजय मुंडे यांनी कौतुक केले.

महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ, विविध योजनांमधून घरकुलांची उभारणी तसेच पांदण रस्ते बांधण्याच्या कामात परळी मतदारसंघ जिल्ह्यात अग्रेसर असून प्रथम क्रमांकावर आले पाहिजे, असे आवाहन श्री. मुंडे यांनी पुढे बोलताना सहकारी व प्रशासनाला केले. 

महाराजस्व अभियानासह स्थानिक प्रशासनाच्या वतीने वैयक्तिक लाभाचे तसेच सार्वजनिक कामांचे काम गतीने करण्यात येत असल्याचा आवर्जून उल्लेख करत धनंजय मुंडे यांनी स्थानीं प्रशासनाचे कौतुक केले. 

यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांनी प्रास्ताविक करून वितरीत करण्यात येत असलेल्या लाभांची माहिती सादर केली तसेच परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी तसेच अपर जिल्हाधिकारी श्रीमती अश्विनी सोनवणे - जिरंगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

व्यासपीठावर माजी आ. संजय दौंड, नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी, अपर जिल्हाधिकारी श्रीमती अश्विनी सोनवणे, उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे, गोविंद देशमुख, बाजीराव धर्माधिकारी, राजाभाऊ औताडे, वैजनाथ सोळंके, राजा पांडे यांच्यासह प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी - कर्मचारी तसेच पदाधिकारी आदी उपस्थित होते.


#धनंजयमुंडे

#परळीवैजनाथ

#महसूलसमाधानशिबिर

#छत्रपतीशिवाजीमहाराजमहसूलअभियान

#सरकारीयोजना

#घरकुलयोजना

#महिलाबचतगट

#उमेदअभियान

#पांदणरस्ते

#लाभार्थी

#बीड

#महाराष्ट्र

#Development

#GovernmentSchemes

#MaharashtraNews

#ParliNews

#BeedNews

#DhananjayMunde

#PublicWelfare

#MBNews

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...