ना. पंकजाताईंचा कामाचा धडाका ; एकाच वेळी दोन बैठका केल्या अटेंड

राज्यात पर्यावरण युक्त सण, उत्सव साजरे करण्यासाठी आगामी काळात महत्वाचा ॲक्शन प्लॅन आखला जाईल

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दिला प्रत्यक्ष कृतीवर भर

बीड दि. ३१ ---

पुढील काळात राज्यात पर्यावरण युक्त आणि प्रदुषणमुक्त सण, उत्सव साजरे व्हावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे यासाठी महत्वाचा ॲक्शन प्लॅन आखून ठोस कृती केली जाईल अशी माहिती राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिली.

   पर्यावरण पूरक सण, उत्सव साजरे करणे आणि पीओपी मूर्तीचे विसर्जन करण्यासंदर्भात पर्यावरण विभागाची एक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ना. पंकजाताई मुंडे बोलत होत्या.

   ना. पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या, पर्यावरण पूरक सण, महोत्सव साजरे करण्याबाबत 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले होते, त्या अनुषंगाने आमचा विभाग ठोस पावले उचलत आहे. जैविक दृष्ट्या विघटनशील मूर्ती व तांत्रिक विसर्जन प्रक्रिया यावर एक महत्वाचा ॲक्शन प्लॅन आम्ही तयार करत आहोत. पाच वर्षे, दहा वर्षे असे वेगवेगळे टप्पे करून आगामी काळात हळूहळू पर्यावरणपूरक व प्रदूषण मुक्त मूर्ती व सण साजरे होतील यासाठी प्रयत्न केले जातील. मागील वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरण विभागाने खूप सुंदर पध्दतीने नगरविकास विभागामार्फत हाताळला होता असे त्या म्हणाल्या. 

ना. पंकजाताईंचा कामाचा धडाका ; एकाच वेळी दोन बैठका केल्या अटेंड

--------

एकीकडे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे आज बीडला आल्या होत्या, आणि दुसरीकडे आजच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण विभागाची बैठकही होती. स्व जिल्हयाची आणि स्व खात्याची अशा दोन्ही बैठकांच्या वेळा एकच आल्या आणि दोन्ही बैठका महत्वाच्या होत्या, अशा परिस्थितीतही त्यांनी मार्ग काढला, नियोजन समितीची बैठक अटेंड करत बाहेर गॅलरीत येऊन मुख्यमंत्र्यांची बैठकही त्यांनी ऑनलाईन अटेंड करत समन्वय साधला, त्यांची ही कृती वाखाणण्याजोगी होती.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!