"मोर्चा खंबीर... विषय गंभीर... मी येतोय परिवारासोबत... तुम्ही या परिवारासाठी!"
हा केवळ मोर्चा नाही, तर समाजाच्या अस्तित्वाचा आणि भावी पिढ्यांच्या हक्कांचा लढा; प्रत्येक कुटुंबाने सहभागी व्हावे उपवर्गीकरणा विरोधातील ऐतिहासिक लढ्यासाठी युवक नेते सचिन कागदे यांचे आवाहन परळी / प्रतिनिधी उपवर्गीकरणाच्या विरोधात सोमवार, दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर युवक नेते सचिन कागदे यांनी समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जाहीर आवाहन केले आहे. हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा संघटनेचा नसून संपूर्ण समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपवर्गीकरणाच्या विरोधात परळी शहरात सोमवार, दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी शहरात जोरदार जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.उपवर्गीकरण विरोधी मोर्चा परळी शहर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन मोर्चामागील भूमिका समजावून सांगत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.हे जनजागृती अभियान परळी शहरातील प्रत्येक नगर व परिसरात राबविण...