"मोर्चा खंबीर... विषय गंभीर... मी येतोय परिवारासोबत... तुम्ही या परिवारासाठी!"

 हा केवळ मोर्चा नाही, तर समाजाच्या अस्तित्वाचा आणि भावी पिढ्यांच्या हक्कांचा लढा; प्रत्येक कुटुंबाने सहभागी व्हावे

उपवर्गीकरणा विरोधातील ऐतिहासिक लढ्यासाठी युवक नेते सचिन कागदे यांचे आवाहन

परळी / प्रतिनिधी

उपवर्गीकरणाच्या विरोधात सोमवार, दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर युवक नेते सचिन कागदे यांनी समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जाहीर आवाहन केले आहे. हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा संघटनेचा नसून संपूर्ण समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपवर्गीकरणाच्या विरोधात परळी शहरात सोमवार, दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी शहरात जोरदार जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.उपवर्गीकरण विरोधी मोर्चा परळी शहर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन मोर्चामागील भूमिका समजावून सांगत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन  करण्यात येत आहे.हे जनजागृती अभियान परळी शहरातील प्रत्येक नगर व परिसरात राबविण्यात येणार असून, समाजातील सर्व घटकांपर्यंत मोर्चाचा संदेश पोहोचविण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे.

यावेळी सचिन कागदे म्हणाले की, उपवर्गीकरणाचा विषय हा समाजाच्या न्याय, समानता, हक्क आणि भवितव्याशी निगडित आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी मतभेद विसरून एकजुटीने या मोर्चात सहभागी व्हावे. समाजाची एकी हीच आपली सर्वात मोठी ताकद असून, त्यातूनच आपल्या भावना शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकतात, असे त्यांनी सांगितले.

मोर्चाच्या अनुषंगाने आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समितीच्या  पदाधिकाऱ्यांनी  परळी शहर तसेच तालुक्यातील गावांमध्ये दारोदारी जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली असून, समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांना मोर्चाचे महत्त्व पटवून देत असून, या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे."घराला कुलूप लावा आणि संपूर्ण परिवारासह मोर्चात सहभागी व्हा. हा केवळ मोर्चा नाही, तर समाजाच्या स्वाभिमानाचा, अस्तित्वाचा आणि भावी पिढ्यांच्या हक्कांच्या संरक्षणाचा निर्णायक लढा आहे," असे आवाहन सचिन कागदे यांनी केले.दरम्यान, "मोर्चा खंबीर... विषय गंभीर... मी येतोय परिवारासोबत... तुम्ही या परिवारासाठी!" हा संदेश देत 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडविण्याचे आवाहन युवक नेते सचिन कागदे यांच्यासह उपवर्गीकरण विरोधी समितीने केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार