सर्व स्तरातून अभिनंदन... पंकजाताईंची पाठीवर कौतुकाची थाप

युपीएससी मध्ये पहिल्याच प्रयत्नात यश; ना. पंकजा मुंडे यांनी केले गाढे पिंपळगावच्या चैतन्य राडकरचे अभिनंदन




परळी वैजनाथ दि. ०८ --

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन करणाऱ्या गाढे पिंपळगाव येथील  चैतन्य सुभाष राडकर याचे राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.

   चैतन्यचे वडील सुभाष रiडकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून ना. पंकजा मुंडे यांनी चैतन्य ला मनापासून शुभेच्छा दिल्या. यासंदर्भात एक ट्विटही त्यांनी केले आहे.

माझ्या मतदारसंघातील  गाढे पिंपळगाव ता. परळी वैजनाथ जि. बीड येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी चैतन्य सुभाष राडकर याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (CAPF) असिस्टंट कमांडंट पदासाठीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्याची असिस्टंट कमांडंट म्हणून नियुक्ती झाली आहे.प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील तरूणांसाठी प्रेरणादायी आहे. चैतन्य..तुझे मनःपूर्वक अभिनंदन..! अशा शब्दांत ना. पंकजाताईंनी अभिनंदन केले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!