प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS: *विघ्नहर्त्याच्या आगमनाने कोरोनाचे मळभ दूर व्हावे - धनंजय मुंडे* *गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देत कोरोनाविषयक खबदरदारी घेण्याचे केले आवाहन*

 *विघ्नहर्त्याच्या आगमनाने कोरोनाचे मळभ दूर व्हावे - धनंजय मुंडे*

*गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देत कोरोनाविषयक खबदरदारी घेण्याचे केले आवाहन*


परळी (दि. २१) ---- : विघ्नहर्ता श्रीगणेशाच्या आगमनाने जगावरील कोरोनाचे मळभ दूर व्हावे अशी प्रार्थना श्रीगणेशाला करत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा वासीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच गणेशोत्सवादरम्यान शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करत कोरोनाविषयी खबरदारी घ्यावी असे आवाहनही केले आहे.


गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा व सबंध राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा उत्सव;कोरोनाच्या सावटाखाली या वर्षी अत्यंत साधेपणाने सर्वत्र साजरा केला जात आहे.


गणेशोत्सव काळात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यादृष्टीने राज्य व जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांना देखील आवश्यक परवाने काढण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यात एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळांनी देखील रीतसर परवानगी घेऊन व सर्व नियमावलीचे पालन करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असे ना. मुंडे यांनी म्हटले आहे.


प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळांनी सॅनिटायझर आदींची व्यवस्था करून ठेवावी तसेच दर्शनाला येणाऱ्या नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक करावे. त्याचबरोबर कुठेही गर्दी जमणार याची खबरदारी घ्यावी, दर्शन व आरतीचा लाभ देण्यासाठी विविध समाजमाध्यमांचा वापर करावा असेही ना. मुंडे यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे. 


श्रीगणेशाच्या आगमनाने जगावरील कोरोना महामारीचे हे मळभ दूर व्हावे यासाठी सर्वजण श्रीगणेशाला प्रार्थना करूयात, असे ना. धनंजय मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या