इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:'त्या' मयत वृध्दाचा कोरोना बाधीत अहवाल आल्याने एकच खळबळ ;अंत्यविधीला १०० ते १५० ग्रामस्थांची उपस्थिती

'त्या' मयत वृध्दाचा कोरोना बाधीत अहवाल आल्याने एकच खळबळ ;अंत्यविधीला १०० ते १५० ग्रामस्थांची उपस्थिती


एका दिवशी कोरोनाचे दोन बळी 

धारुर / प्रतिनिधी

धारुर तालुक्यातील गांवदरा येथिल एका वृद्धाचा मृत्यू बुधवारी रात्री झाला होता. गुरुवारी सकाळी या वृद्धावर गावंदरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या वेळी १०० ते १५० गांवकरी उपस्थित होते. सदर वृद्धाचा कोरोना बाधित अहवाल आल्याने गावंदरा गावात एकच खळबळ उडाली आहे. गुरूवारी कोरोन मुळे तालूक्यात दोन जनाचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे.


         सविस्तर वृत्त असे की धारुर तालुक्यातील गावंदरा येथील 62 वर्षीय वृद्धाला बुधवारी सायंकाळी थंडी ताप व हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता या वृद्धास धारुर येथील खाजगी रुग्णालयात उपचारा साठी नेण्यात आले होते. धारूर येथील स्वॕब सेंटरला बुधवारी वृद्धाचा स्वॅब देण्यात आला होता त्याचा अहवाल गुरूवारी कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले असून मयत वृद्धावर गुरुवारी सकाळी गावंदरा येथे हे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी अंत्यविधीस गावातील शंभर ते दिडशे नागरिक उपस्थित असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या बाबत गावात जाऊन चौकशी करून कान्टेक्ट ट्रेंसिग करण्यात येईल असे तालूका आरोग्य अधिकारी डाॕ सचिन शेकडे यांनी सांगीतले.

कोरोना मुळे कारी येथील 61 वर्षीय वृध्दाचा मृत्यू गुरूवारी पहाटे अंबाजोगाई येथे उपचार सुरू असतान झाला.एक दिवशी तालूक्यात दोन मृत्यू झाल्याने माञ खळबळ माजली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या