MB NEWS: लाडझरी सज्जाच्या तलाठी रेश्मा गुणालेंचे दुख:द निधन

 लाडझरी सज्जाच्या तलाठी रेश्मा गुणालेंचे दुख:द निधन 


परळी वैजनाथ/ प्रतिनिधी 


परळी तालुक्यातील लाडझरी सज्जा येथे कार्यरत तलाठी रेश्मा  गुणाले  यांचे काल रविवारी रात्री लातुर येथिल खाजगी रुग्णालयात दुख:द निधन झाले. 


       तलाठी रेश्मा गुणाले या बाळंतपणासाठी लातुर येथिल रुग्णालयात काल रविवारी दाखल करण्यात आल्या होत्या. रात्री बाळांतपणा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असुन बाळ सुखरुप असल्याची माहिती मिळतेय, गुणाले यांच्या निधनाने परळी महसुल च्या सर्व कर्मचारी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.एक महिला सक्षम सहकारी कर्मचारी आम्ही गमावली असुन त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे आतीव दुख: झाले असून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती ईश्वराने त्यांच्या कुटुंबियांना देवो अशी प्रतिक्रिया परळी तहसीलचे तहसीलदार डाँ.विपीन पाटील यांनी व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!