इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:खा.प्रितमताई मुंडे यांनी केले पवार,भोसले कुटुंबीयांचे सांत्वन बीडचे निवृत्त मंडळ अधिकारी शेख जहांगीर यांच्या कुटुंबीयांची ही घेतली भेट

 खा.प्रितमताई मुंडे यांनी केले पवार,भोसले कुटुंबीयांचे सांत्वन


बीडचे निवृत्त मंडळ अधिकारी शेख जहांगीर यांच्या कुटुंबीयांची ही घेतली भेट

गेवराई.दि.२१----बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी काल ( दि.२१ ) गेवराई येथे भेट देऊन भाजपचे गेवराई तालुका विस्तारक ईश्वर पवार यांचे वडील स्व.भाऊराव पवार व पत्रकार स्व.संतोष भोसले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.याप्रसंगी त्यांच्यासोबत गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

गेवराई तालुक्यातील रोहीतळ येथे भेट देऊन खा.प्रितमताई मुंडे यांनी ईश्वर पवार व त्यांच्या  कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन पवार कुटुंबाला आधार दिला.गेवराई शहरातील पत्रकार स्व.संतोष भोसले यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते,भोसले यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.खा.प्रितमताई मुंडे यांनी पवार यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.तसेच गेवराईचे नगरसेवक राजाभाऊ आर्दंड यांच्या घरी भेट देऊन आर्दंड यांच्या मातोश्रींच्या निधनावर शोक व्यक्त केला.याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे,उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर,बंडू बारगजे होते.

तर बीड येथे भाजप नेते सलीम जहांगीर यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांनी जहांगीर कुटुंबाचे सांत्वन केले.शेख जहांगीर साहेब हे निवृत्त मंडळ अधिकारी होते.कुटुंब वत्सल व सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती.खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्यासह रमेश पोकळे व भाजपचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या