इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन -धनंजय मुंडे

 *सफाई कामगारांसाठी  स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन* 

               *धनंजय मुंडे*


मुंबई दि . 28. सफाई कामगारांच्या विविध प्रश्न  व समस्या सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन असल्याचे 

  प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. 

     सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री मुंडे बोलत होते .यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे , समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे ,सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे  ,   सफाई कामगार संघटनेचे गोविंदभाई परमार , विविध सफाई कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि सामाजिक न्याय ,वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नगरविकास 

विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

         श्री मुंडे म्हणाले,  सफाई कामगारांच्या बाबतचा लाड-पागे समितीचा अहवाल व सद्यस्थिती यांचा समन्वय साधून योग्य निर्णय घेतला   जाईल. कामगारांच्या निवाराच्या प्रश्न सोडविण्यासाठी विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील. सफाई कामगारांच्या वारसा हक्क नियुक्ती देण्यासंदर्भात प्राधान्याने विचार करणार. नियुक्ती बाबतीत शैक्षणिक अर्हता बाब तपासणार. सफाई कामगारांचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सतत  प्रयत्न करणार असल्याचेही श्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या