इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:सकल मराठा समाज दादाहरी वडगाव यांच्या वतीने दि. 7 पासून ग्रामपंचायत समोर साखळी धरणे आंदोलन

 


सकल मराठा समाज दादाहरी वडगाव यांच्या वतीने दि. 7 पासून ग्रामपंचायत समोर साखळी धरणे आंदोलन 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     मराठा आरक्षणाची अंतरिम स्थगिती उठवावी व मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल मराठा समाज यांच्या वतीने वडगाव दादाहरी येथे  दिनांक सात ऑक्टोबर पासून साखळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

       याबाबत सकल मराठा समाज दादाहरी वडगाव यांच्यावतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी शासनाने सर्वतोपरी भूमिका घ्यावी. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत नोकरी व शिक्षणातील सर्व सवलती देण्यात याव्या. आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरती  मध्ये मराठा समाजाला सवलत द्यावी. आदी मागण्यांचा समावेश या निवेदनात करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या विषयावर सकल मराठा समाजाच्या भावना तीव्र असून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रित पणे लढा देण्याची समाज बांधवांची ची तयारी आहे. या अनुषंगाने परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे हे दिनांक सात ऑक्टोबर पासून ग्रामपंचायतीसमोर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या