MB NEWS:पंकजा मुंडेंचे नांदेड विमानतळावर जोरदार स्वागत

 पंकजा मुंडेंचे नांदेड विमानतळावर जोरदार स्वागत 


नांदेड, प्रतिनिधी....

      अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतक-यांना धीर देण्यासाठी तसेच त्यांना मदत मिळवून देण्याकरिता भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे दि. 20 ऑक्टोबर रोजी पासून मराठवाड्यात विविध जिल्हयाचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचे नांदेड विमानतळावर जोरदार स्वागत झाले.पंकजाताईंच्या स्वागताला विमानतळाबाहेर प्रचंड गर्दी झाली होती. त्यांचे आगमन होताच "कोण आली रे कोण आली -महाराष्ट्राची वाघीण आली!" घोषणांनी परिसर दणाणून गेल्याचे दिसून आले.



  अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतक-यांना धीर देण्यासाठी तसेच त्यांना मदत मिळवून देण्याकरिता भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे दि. 20 ऑक्टोबर रोजी पासून मराठवाड्यातील विविध जिल्हयाचा दौरा करणार आहेत. गुरूवारी त्या बीड जिल्हयातील गावांना भेटी देणार आहेत.



          गुरूवारी बीड जिल्हयात पाहणी 

     दि. 20 आणि 21 ऑक्टोबर यादिवशी मराठवाड्यातील अतिवृष्टी पाहणी दौरा करून पंकजाताई मुंडे 22 तारखेला सकाळी औरंगाबाद येथून शहागड, गेवराई, बीड, वडवणी, तेलगाव असा दौरा करून सिरसाळा मार्गे गोपीनाथ गड दर्शन व परळीला येणार आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार