MB NEWS: सोनपेठ,भाजयुमो सोनपेठ तालुकाध्यक्ष पदी गणेश हांडे

 भाजयुमो सोनपेठ तालुकाध्यक्ष पदी गणेश हांडे 



 सोनपेठ प्रतिनिधी

       भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पदी गणेश आश्रोबा हांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.माजी आमदार मोहन फड यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती चे पत्र त्यांना प्रदान करण्यात आले आहे.

       सोनपेठ तालुक्यातील भाजप, भाजयुमो कार्यकारिणी नुकतीच निवडण्यात आली आहे.यामध्ये महत्त्वपूर्ण समजली जाणारी भाजयुमो तालुकाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती.या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी नखतवाडी येथील युवा कार्यकर्ते गणेश आश्रोबा हांडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.याबाबतचे नियुक्ती पत्र नुकतेच माजी आमदार मोहन फड,भाजप तालुकाध्यक्ष सुशील रेवडकर व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे.या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.



निवड सार्थ करून दाखवू-गणेश हांडे

सोनपेठ तालुक्यात माजी आमदार मोहन फड , तालुकाध्यक्ष सुशील रेवडकर व जेष्ठ नेते, पक्षाचे नेते, पदाधिकारी, आदींच्या नेतृत्वाखाली भाजयुमो च्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे सर्वदूर पोहोचावीत यासाठी प्रामाणिक प्रयत्न करुन आपली निवड सार्थ करून दाखवू असा विश्वास नवनिर्वाचित भाजयुमो तालुकाध्यक्ष गणेश हांडे यांनी व्यक्त केला आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार