इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:कृषी विद्यापीठाने व्यक्त केली शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता...

 


कृषी विद्यापीठाने व्यक्त केली शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता...

बीड, परभणी ,लातुर जिल्ह्यात शक्यता


परभणी,(प्रतिनिधी) ः परभणीसह लातूर, बीड जिल्ह्यात शनिवारी (दि.दहा) वादळीवार्‍यासह पावसाची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने वर्तवली आहे.

दरम्यान, बुधवारपासून ते शुक्रवारपर्यंत (दि.सात ते नऊ) मराठवाड्यात कोरड्या हवामानाची शक्यताही वर्तवली आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार मराठवाडयात नांदेड जिल्हयात दिनांक 07 ऑक्टोबर 2020 रोजी तर लातूर, बीड, परभणी जिल्ह्यात दिनांक 10 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता आहे.मराठवाड्यात बुधवारपासून ते शुक्रवारपर्यंत (दि.सात ते नऊ) या कालावधीत कोरड्या हवामानाची शक्यता असल्यामुळे काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असे म्हटले आहे. त्याचबरोबर शनिवारपासून (दि.दहा) ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पावसाची शक्यता असल्यामुळे पीक पावसात भिजणार नाही याचीही काळजी घ्यावी, असेही वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठातील ग्रामीण कृषि मौसम सेवाविभागाने म्हटले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या