MB NEWS:प्रा.डॉ.जगदीश कावरे यांची महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड

 *प्रा.डॉ.जगदीश कावरे यांची महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड 



परळी वैजनाथ,प्रतिनिधी...

      दयानंद व्यायाम शाळा परळी वैजनाथ जिल्हा बीड च्या माध्यमातून तरुण पिढीला बलोपासनेची दिशा देणारे व अनेक विधायक कार्यात सतत अग्रभागी असणारे परळीतील शारीरिक शिक्षण प्रशिक्षक प्रा.डॉ जगदीश कावरे यांची महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.

      

       जगदीश कावरे हे परळीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दयानंद व्यायामशाळा, हनुमान व्यायामशाळा आदींच्या माध्यमातून बलोपासनेचे ते सक्रिय प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कुस्ती मल्लविद्या क्षेत्रात भरीव योगदान आहे.तसेच शारीरिक शिक्षण विषयातील सर्वच क्रिडा प्रकारात ते शिंपून आहेत.केवळ प्रशिक्षकच नाही तर ते स्वत: उत्कृष्ट खेळाडू आहेत. हे योगदान लक्षात घेऊन यापुर्वी त्यांची बीड जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या परळी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार