MB NEWS:पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते वैद्यनाथ साखर कारखान्याचा बुधवारी गाळप शुभारंभ

 पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते वैद्यनाथ साखर कारखान्याचा बुधवारी गाळप शुभारंभ 



परळी वैजनाथ दि. २३.

       पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सन 2020-21 या गाळप हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवार दि. २५ नोव्हेंबर रोजी कारखान्याच्या अध्यक्षा तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे वतीने करण्यात आले आहे. 

        वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना यावर्षी पुर्ण क्षमतेने चालण्यासाठी सज्ज झाला आहे. कारखान्याचे बाॅयलर अग्नी प्रदीपन नुकतेच संपन्न झाले आहे. कारखान्याच्या गाळप हंगामाची ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर, मुकादम आणि इतर व्यवसायीकांना प्रतिक्षा आहे. उद्या बुधवार दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता कारखान्याच्या अध्यक्षा तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते कारखान्याच्या गाळपाचा शुभारंभ होणार आहे. 

   या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर, मुकादम व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे संचालक मंडळाने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार