MB NEWS:२६/११ शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुरूवारी परळीत रक्तदान शिबिर

 २६/११ शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुरूवारी परळीत रक्तदान शिबिर



कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम

परळी | प्रतिनिधी

२६/११ मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली म्हणून येथील कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानने रक्तदान शिबीर आयोजित केले असून या शिबिरात अधिकाधिक युवकांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.


गुरूवार  दि.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा.उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ येथे सदरील शिबीर होत असून या शिबिरातील रक्तसंकलनासाठी शासकीय रक्तपेढी अंबाजोगाई येथील पथक येणार आहे तरी शहर व परिसरातील रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान करून या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


*

*उपजिल्हा रुग्णालयात होणार रक्तदान

*शासकीय रक्तपेढी अंबाजोगाईचे रक्तसंकलन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!