प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS: *अन् 'त्या' जखमी ऊसतोड कामगारास पंकजाताई मुंडेंनी दिला मायेचा आधार !* *आस्थेने विचारपूस करत मुलांच्या संगोपनाची घेतली जबाबदारी ! कामगाराच्या घरची चटणी - भाकरीही केली गोड*

 *अन् 'त्या' जखमी ऊसतोड कामगारास  पंकजाताई मुंडेंनी दिला मायेचा आधार !*



*आस्थेने विचारपूस करत मुलांच्या संगोपनाची घेतली जबाबदारी !  कामगाराच्या घरची चटणी - भाकरीही केली गोड*


बीड.दि.२४-----अहोरात्र राबून उदरनिर्वाह करणाऱ्या ऊसतोड कामगारांवर कुणापुढे हात पसरवण्याची वेळ येऊ देणार नाही.ऊसतोड मजुरांनी स्वाभिमानाने जीवन जगावे,तुमची नैतिक जवाबदारी माझी आहे अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी पाडळी ता.शिरूर येथील जखमी ऊसतोड मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांना मायेचा आधार दिला. या प्रसंगाने त्या कामगारालाही गहिवरून आले.


शिरूर तालुक्यातील पाडळी येथील ऊसतोड मजूर गणेश मिसाळ हे काही दिवसांपूर्वी प. महाराष्ट्रातील एका कारखान्यात अंगावर गेट कोसळून गंभीर जखमी झाले होते. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि ऊसतोड मजुरांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी मिसाळ आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला व तब्येतीची आस्थेने विचारपूस केली.यावेळी पंकजाताई मुंडे यांनी त्यांना धीर दिला. ऊसतोड मजूर हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तुम्ही खचून न जाऊ नका, मी कायम तुमच्या पाठीशी आहे असे म्हणत मिसाळ यांच्या वृद्ध पित्याच्या पाठीवर हात टाकून आधार दिला. ऊसतोड मजूर गणेशला उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे दाखवून त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या पायावर उभे करू असं सांगत त्यांच्या दोन्ही मुलांची जवाबदारी स्वीकारली. यावेळी गणेशच्या वडिलांनी  लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या आठवणींना उजाळा देत आज पंकजाताईंच्या रुपात मुंडे साहेब आल्याची भावना व्यक्त करत त्यांना जेवणाचा आग्रह केला. पंकजाताई यांनी देखील जमिनीवर बसून चटणी - भाकरी खाल्ली. या प्रसंगाने उपस्थितही गहिवरून गेले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या