इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS: video-गंगाखेड रोडवर करम-निळा जवळ भिषण अपघात;चार जण जागेवर ठार

 गंगाखेड रोडवर करम-निळा जवळ भिषण अपघात;चार जण जागेवर ठार





परळी वैजनाथ, प्रतिनिधी

गंगाखेड रोडवर करम ते निळा फाट्या दरम्यान भिषण अपघात झाला असुन चार जण जागेवर ठार झाल्याची घटना रात्री ८.०० वा. सुमारास घडली आहे. सोनपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

    गंगाखेड रोडवर करम ते निळा फाट्या दरम्यान खोरी नावाने ओळखले जाणार्या ठिकाणी एक अॅटोरिक्षा व टिप्परची जोराची धडक होऊन भयानक अपघात घडला आहे. . या भिषण आपघातात अॅटोरिक्षातील चार जण जागीच गतप्राण झाले आहेत. मयत अंबाजोगाई चे असल्याचे प्रथमदर्शनी समजते. अॅटोरिक्षातील लोक गंगाखेड जवळील झोलपिंपरी येथे एका लग्नाहून अंबाजोगाईला परत जात होते अशी प्राथमिक माहिती आहे. दरम्यान हायवे पोलीस व सोनपेठ पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

-------++video________



टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. प्राथमिक माहिती नुसार बातमी होती.... सुधारित करण्यात आली आहे.आता संख्या बरोबर करण्यात आली आहे. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या