MB NEWS-*सिरसाळ्यात चिमुकल्या दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार* • _परळी तालुक्यात घटनेने खळबळ_•

 *सिरसाळ्यात चिमुकल्या दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार*



 • _परळी तालुक्यात घटनेने खळबळ_•


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

             तालुक्यातील सिरसाळा येथे दोन अल्पवयीन बालिकांवर लैंगिक अत्याचाराची खळबळजनक घटना घडली आहे. हा प्रकार आठ ते दहा दिवसा पुर्वीच घडला असल्याचे पिडिताच्या नातेवाईकाने सांगितले आहे. प्रकार होऊन आठ ते दहा झाले परंतु ह्या प्रकरणी भिती पोटी पिडित मुलींनी घरच्यांना सांगीतले नव्हते. रविवारी ह्या प्रकारा बाबत पिडित चिमुकल्या दोघी मुलींनी आईला सांगितले व प्रकार समोर आला.या प्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

             सिरसाळा पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलींच्या वडिलांनी आपल्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची फिर्यादी दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे कि,आपली एक मुलगी ७ वर्षाची आहे व एक ८ वर्षाची आहे.दोघींना घराशेजारीच राहणारा आरोपी याने घरात नेऊन त्यांचे पुर्ण कपडे काढून त्यांच्याशी अश्लील चाळे, अश्लील कृत्य केले. दोन्ही चिमुकल्या मुलींशी अत्यंत गैर वर्तन केले आहे. पिडित मुलींनी कुणालाही काही सांगू नये म्हणून त्यांना धमकावले. म्हणून हा प्रकार इतके दिवस उघड झाला नव्हता अखेर पिडित मुलींनी घरी सांगीतल्याने घटना उघड झाली. याप्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात कलम ३७६ अ,ब,३५४ अ,बाल अत्याचार अधिनियम ४/ ८/१२ पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स. पोलिस निरिक्षक श्रीकांत डोंगरे पाटील अधिक तपास करत आहेत. आरोपी फरार आहे. सिरसाळा व परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार