इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS-परळी पोलीसांची गाडी अंबाजोगाई रस्त्यावर पलटली ! दोन आरोपींना लातुरला सोडुन येत असताना घडली घटना

 परळी  पोलीसांची गाडी अंबाजोगाई रस्त्यावर पलटली !

दोन आरोपींना लातुरला सोडुन येत असताना घडली घटना


 परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......


  दोन आरोपींना लातुरला सोडून येत असतानाअसताना परळी पोलीसांची गाडी अंबाजोगाई रस्त्यावर पलटली.हा अपघात काल दि.२१ रात्री घडला आहे.

      याबाबत माहिती अशी की, परळी शहर पोलिस ठाण्याची बोलेरो गाडी घेऊन पो.हे.काॅ. चट्टे व दोन होमगार्ड हे लातुरकडून परळीला परत जात होते.परळी पोलीसांच्या ताब्यात असलेल्या दोन आरोपींना लातुरला तुरुंगात सोडण्यासाठी गेलेली ही गाडी परत येताना गिरवलीच्या पुढे अंबाजोगाई रस्त्यावर असतांनाच पलटली व आपघात घडला.यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पो.हे.काॅ. चट्टे व दोन होमगार्ड जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरु आहेत.

      दरम्यान पोलीसांना देण्यात आलेल्या गाड्यांची आता खुप जुन्या झालेल्या आहेत.पोलीसांना नविन अद्यावत गाड्या उपलब्ध करुन देण्यात याव्यात अशी अनेक दिवसापासून मागणी आहे.अशा अपघातानंतर ही मागणी ऐरणीवर आली आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....