इमेज
  घरकुल लाभार्थ्यांची थट्टा थांबवा, अन्यथा आंदोलन; महादेव गंगणे पाटील यांचा परळी पालिकेला इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) रमाई घरकुल योजनेंतर्गत १५४ लाभार्थ्यांना १ कोटी १ लाख ८१ हजार २५० रुपयांचा निधी वर्ग केल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून स्वतःची पाठ थोपवून घेणाऱ्या परळी नगर परिषदेचा फुगा फुटला आहे. प्रत्यक्षात एकाही लाभार्थ्याला रुपया देखील मिळाला नसून, नगर परिषदेने केवळ कागदी घोडे नाचवले असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला तीव्र जाब विचारला आहे. प्रसिद्धीचा स्टंट, प्रत्यक्षात लाभार्थी वंचित महादेव गंगणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगर परिषदेच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी रमाई आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी वाटप केल्याचा दावा प्रसिद्धी माध्यमांद्वारे केला होता. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यांची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या हाती निराशाच आली. अनेक गरीब आणि गरजू लाभार्थी अद्यापही पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यापासून वंचित आहे...

MB NEWS-वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत युवा नेते गोविंद सोनवणे यांची पुरग्रस्तांना मदत पन्नास हजार रुपये पंकजाताई मुंडे यांच्याकडे केले सुपूर्द परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भाजपाचे युवा नेते गोविंद सोनवणे यांनी स्वताच्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत तसेच वाढदिवस साजरा न करता पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील पुरग्स्तांना आर्थिक मदत केली असून पन्नास हजार रुपये भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांच्या या कार्याचे पंकजाताई मुंडे यांनी कौतुक केले असून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन या स्तुत्य उपक्रमाबद्दल सत्कार केला. आज 29 जुलै रोजी भाजपाच्या वतीने पुरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली. माजी ग्रामविकास मंञी तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे स्वत या फेरीत सहभागी झाल्या होत्या. तत्पूर्वी भाजपाचे युवा नेते गोविंद सोनवणे यांनी सामाजिक जाणिवेतून आपला वाढदिवस साजरा न करता पुरग्रस्तांसाठी पन्नास हजार रुपयांची मदत दिली. सदर मदत त्यांनी पंकजाताई मुंडे यांच्याकडे सुपूर्द केली. पंकजाताई मुंडे यांनी या राष्ट्रीय कार्याबद्दल गोविंद सोनवणे यांचे विशेष कौतुक केले. तसेच त्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार केला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिष मुंडे, जयश्रीताई गित्ते-मुंडे, गणेश कराड, शशिकांत मुंडे, गोविंद मोहेकर, चंद्रकांत देवकते, महादेव फड, प्रा.बिभीषण फड, गोपी कांगणे, श्रीनिवास राऊत यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. गोविंद सोनवणे यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वञ अभिनंदन होत आहे.

 वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत युवा नेते गोविंद सोनवणे यांची पुरग्रस्तांना मदत 



पन्नास हजार रुपये पंकजाताई मुंडे यांच्याकडे केले सुपूर्द 


परळी  वैजनाथ (प्रतिनिधी)  :-  भाजपाचे युवा नेते गोविंद सोनवणे यांनी स्वताच्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत तसेच वाढदिवस साजरा न करता पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील पुरग्स्तांना आर्थिक मदत केली असून पन्नास हजार रुपये भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांच्या या कार्याचे पंकजाताई मुंडे यांनी कौतुक केले असून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन या स्तुत्य उपक्रमाबद्दल सत्कार केला. 

       आज  29  जुलै रोजी भाजपाच्या वतीने पुरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली. माजी ग्रामविकास मंञी तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे स्वत या फेरीत सहभागी झाल्या होत्या. तत्पूर्वी भाजपाचे युवा नेते गोविंद सोनवणे यांनी सामाजिक जाणिवेतून आपला वाढदिवस साजरा न करता पुरग्रस्तांसाठी पन्नास हजार रुपयांची मदत दिली. 

          सदर मदत त्यांनी पंकजाताई मुंडे यांच्याकडे सुपूर्द केली. पंकजाताई मुंडे यांनी या राष्ट्रीय कार्याबद्दल गोविंद सोनवणे यांचे विशेष कौतुक केले. तसेच त्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार केला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिष मुंडे, जयश्रीताई गित्ते-मुंडे, गणेश कराड, शशिकांत मुंडे, गोविंद मोहेकर, चंद्रकांत देवकते, महादेव फड, प्रा.बिभीषण फड, गोपी कांगणे, श्रीनिवास राऊत यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. गोविंद सोनवणे यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वञ अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....