नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...

MB NEWS-पंकजाताई मुंडेंच्या वाढदिवशी परळीत दीपोत्सव !* *वैद्यनाथ मंदिर परिसरात हजारो पणत्या उजळल्या ; 'एक दिवा आपल्या लेकीच्या सन्मानार्थ' कार्यकर्त्यांचा उपक्रम*

 *पंकजाताई मुंडेंच्या वाढदिवशी परळीत दीपोत्सव !*

*वैद्यनाथ मंदिर परिसरात हजारो पणत्या उजळल्या ; 'एक दिवा आपल्या लेकीच्या सन्मानार्थ'  कार्यकर्त्यांचा उपक्रम* 


परळी । दिनांक २७।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस सोमवारी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी अनोख्या पध्दतीने साजरा केला.  'एक दिवा आपल्या लेकीच्या सन्मानार्थ ' उपक्रमांतर्गत महिलांनी वैद्यनाथ मंदिर परिसरात पणत्या प्रज्वलित करून वाढदिवस साजरा केला. हजारो पणत्यांनी मंदिर परिसर उजळून गेल्याने जणू दीपोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.


  वाढदिवस साजरा करत असताना कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी न करता “एक दिवा आपल्या लेकीच्या सन्मानार्थ” हा उपक्रम राबवला. पंकजाताईंनी तसे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. यालाच प्रतिसाद देत परळीत प्रभू वैद्यनाथाच्या मंदिर परिसरात महिलांनी पणत्या लावून दीपोत्सव केला. आपल्या लाडक्या नेत्या पंकजाताई मुंडे यांना दीर्घायुष्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.

परळीत या उपक्रमाला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. कोकणात महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. ही परिस्थिती पूर्वपदावर येऊन तिथल्या नागरिकांना जगण्याची नवी उमेद मिळावी, कोरोना महामारी लवकर संपून जनजीवन पूर्वपदावर यावे अशी प्रार्थना देखील यावेळी करण्यात आली. प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात  असंख्य पणत्या लावल्याने मंदिर परिसर उजळून निघाला होता. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या