इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-पूरग्रस्तांच्या मदतीसाठी परळीत उद्या भाजपची मदतफेरी ; पंकजाताई मुंडे होणार सहभागी*

 *पूरग्रस्तांच्या मदतीसाठी परळीत उद्या भाजपची मदतफेरी ; पंकजाताई मुंडे होणार सहभागी*




परळी । दिनांक २७।

राज्यातील विविध भागात आलेल्या पुरामुळे नागरिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांना निधी अथवा वस्तू स्वरूपात मदत करण्यासाठी परळीत येत्या २९ जुलै रोजी भाजपच्या वतीने मदतफेरी काढण्यात येणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हया या फेरीत स्वतः सहभागी होणार आहेत. 


राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, चिपळूण आदी भागात नुकत्याच झालेल्या महापुरामुळे हजारो लोक बेघर झाले असून जिवित व मालमत्तेचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अशा  संकटात लोकांना आज मदतीची गरज आहे, त्यामुळे वाढदिवसाच्या कार्यक्रमांवर होणारा खर्च टाळून पूरग्रस्तांना वस्तू स्वरूपात मदत करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. 


गुरूवारी २९ जुलै रोजी सकाळी ९.३० वा. छत्रपती शिवाजी चौक येथून या मदतफेरीस प्रारंभ होणार असून पंकजाताई मुंडे यात सहभागी होणार आहेत. ही मदतफेरी स्टेशन रोड, टाॅवर मार्गे गणेशपार पर्यंत जाणार आहे. या फेरीत नागरिक, व्यापाऱ्यांनी पूरग्रस्तांना वस्तू स्वरूपात मदत करावी तसेच कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या