युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीत मंगळवारी निदर्शने*

 *पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीत मंगळवारी निदर्शने*


 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

            केंद्र सरकारने वाढविलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे  सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून ही दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी; यासाठी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीत मंगळवारी दि.६ रोजी निदर्शने करण्यात येणार आहेत.

             केंद्रातील मोदी सरकारने पेटोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किंमती भरमसाठ वाढविल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार कला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही दरवाढ सामान्य माणसाच्या जीवनावर उठली आहे. तसेच स्वयंपाकाचा गॅसही महागला आहे. यामुळे सामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कोरोनाच्या संकटाने आधीच जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे. मोदी सरकारने पेट्रोल- डिझेलमधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे. याच्या निषेधार्थ ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. मंगळवारी (दि.६) सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. कोविडविषय नियमांचे काटेकोरपणे पालन करून हे आंदोलन करण्यात येणार आहे.

             तरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पदाधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या